तुझ्या शिवाय आयुष्य खरच खुप छान होत,
माझ एकट्याच स्वच्छंदी अस रान होत.
एक दिवस तुला बघितल आणि प्रेमाची घंटी वाजली,
त्या नंतर काय विचारा माझी प्रेम कहाणी कीती गजली.
तु आयुष्यात आल्यावर सगळच अचानक बदलल,
माझ विश्व आता तुझ्या भोवती फिरू लागल.
पुर्वीच्या गर्दीत आता तुझ्याशिवाय उगाचच एकाकी असतो मी,
पण तुझ्या बरोबरच्या एकांतात तुझीच लाखो रूप बघतो मी.
आज तु आहेस, मी आहे आणि आहे हा एकांत;
आज तोडूया सगळे बंध,
होऊदे ती हुरहुर शांत.
मग माझच मन सांगत की खरी मजा बंधनात आहे,
वाहत जातात ओहोळ देखील पण स्थिरता सागराच्या स्पंदनात आहे.
आता मात्र आयुष्याला तुझ्यामुळेच अर्थ आहे,
#मुक्तछंद
तु नसलीस तर जिवन काय मृत्यू देखिल व्यर्थ आहे.
No comments:
Post a Comment