मिठी
प्रत्येक कवितेत मी तुलाच
पाहीन अन् तु मला पाहशील।
किती ही राग राग करं माझा
पण चोरून कविता वाचशील।
तुझ्या विरहात दुखी मी आहे
कवितेचे शब्द रक्तभंबाळ तुला करतील।
छाती ठोकपणे सांगतो सजने
कविता वाचून तु नक्की रडशील।
तुझ्यासोबत घालवलेले माझे थोडे
क्षण तू नक्कीच आठवशील।
परत येशील तु विश्वास आहे
चुकले मी असं रडतं म्हणशील।
स्वतः चे भान हरपुन मला
जोरात मिठी मारशील।
No comments:
Post a Comment